वाढदिवशी प्रेयसीला दिले कधीही न विसरता येणारे गिफ्ट; जंगलात घेऊन गेला अन्…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये प्रियकराने प्रेयसीच्या वाढदिवशी तिला गिफ्ट देण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. हा आरोपी प्रियकर एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडित मुलीचे बलात्कार करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. बलात्काराचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडितेने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण
आरोपी प्रियकराचे नाव सन्मुखसिंग बुंदेल आहे. तो चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर या ठिकाणचा रहिवाशी आहे. त्याची प्रेयसीदेखील याच शहरात राहते. आरोपी सन्मुखसिंग बुंदेल याने प्रेयसीला वाढदिवसाचे गिफ्ट देतो असे सांगत कारवा जंगलात नेले. या ठिकाणी आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने बलात्कार करतानाचे व्हिडीओ आणि फोटो देखील काढले. यानंतर त्या प्रियकराने फेसबुकवर बनावट खाते काढून बलात्काराचे सर्व व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल केले.

आरोपी प्रियकराने सोशल मीडियावर केलेल्या या संतापजनक प्रकरानंतर पीडित मुलीने पोलिसांत जाऊन गुन्हा दाखल केला आहे. आरोपी प्रियकर हा पीडितेला जातीवाचक शब्दात बोलायचा. आरोपीच्या या लज्जास्पद वागणुकीमुळे पीडितेनं आरोपीला लग्नास नकार दिला होता. प्रेयसीने लग्नाला दिलेल्या नकार पचवता न आल्याने आरोपीने, ऐन वाढदिवसी गिफ्ट देण्याचा बहाणा करत जंगलात नेऊन तिच्यावर करत याचा बदला घेतला. हि घटना शुक्रवारी घडली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी आरोपी प्रियकर सन्मुखसिंग बुंदेलला अटक केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

Leave a Comment