BREAKING NEWS : सातारा जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा पहिला मृत्यू, सध्या 21 रूग्ण उपचार्थ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसचा पहिला मृत्यू झाला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात बाधितावर उपचार सुरू होता. जिल्ह्यात सध्या 21 म्युकरमयकोसिसचे बाधित रूग्ण उपचार घेत असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोरोनाचे संकट असताना म्युकरमायकोसिसचाही आता सामना करावा लागत आहे. करोना संकटकाळात ‘म्युकरमायकोसिस’ अर्थात ब्लॅक फंगसचं दहशत पसरली आहे. गेल्या काही दिवसात देशांमध्ये ब्लॅक फंगसची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. आता सातारा जिल्ह्यातही या आजाराचे रूग्ण आढळले असून त्यातील पहिला बळी गेला आहे.

म्युकरमायकोसिस काय आहे हा आजार?

म्युकरमायकोसिस या आजाराचा संसर्ग नाक, तोंड या मार्गाने मेंदूपर्यंत होऊ शकतो. मेंदूपर्यंत संसर्ग पोहोचल्यावर उपचारांना एकदम मर्यादा येतात. सध्या प्रामुख्याने कोरोनाची बाधा झालेल्या आणि रोगप्रतिकारक क्षमता दुर्बल असलेल्या अनेकांना म्युकरमायकोसिसची लागण होत आहे. कोरोनानंतर अनेकांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. म्युकरमायकोसिस या आजारात अंधत्व येण्याचा धोका आहे. रुग्णाच्या जगण्याची शक्यता जेमतेम ५० टक्के एवढीच आहे. काळ्या बुरशीचा आजार असेही म्युकरमायकोसिस या आजाराला म्हणतात.

Leave a Comment