कोण राज ठाकरे? राज ठाकरेंना मीडियाने मोठं केलं; आमदार अबू आझमींची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज ठाकरे कोण आहे? राज ठाकरेंना मीडियाने मोठं केले आहे. शॅडो कॅबिनेट वगैरे हे सगळं नाटक आहे, आता राज ठाकरेंचं कोणतं स्थान नाही, अशी घणाघाती टीका समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी केली आहे.ते माध्यमांशी बोलत होते. राज ठाकरे यांनी काल झालेल्या मनसेच्या महाअधिवेशनात बदललेली भूमिका मांडली आणि मोदी सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला तसेच NRC ला समर्थन दिले.

शिवसेना महाराष्ट्रात नाही देशभर वाढणार

मला बदबू आझमी म्हणणारे राज ठाकरे आमदार त्रस्त आहेत, त्यांचे आमदारच निवडून येत नाहीत. शिवसेना तीस वर्षापासून कार्यरत आहे. त्यांना भाजपने धोका दिला आहे. शिवसेना केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरामध्ये वाढणार आहे, याची मला खात्री आहे, असं अबू आझमी म्हणाले.

राज ठाकरे आता भाजपसोबत जाऊन धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. जो माणूस तडीपार होता, गुजरातच्या जेलमध्ये बंद होता, आज तो देशातील लोकांची नागरिकता तपासत आहे, असं म्हणत अबू आझमींनी अमित शाहांवर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडलं.

Leave a Comment