राज्यातल्या जनतेनं या सरकारचं काय घोडं मारलंय? – मुंडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी। विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष केलं आहे. धनंजय मुंढे यांनी पुण्यात पावसामुळे तयार झालेल्या भीषण परिस्थितीबाबत आपल्या ट्विटर हँडल वरून मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे ट्विट नुकतेच केलं आहे.

‘पुणे आणि परिसरात प्रचंड पाऊस झाल्यानं भीषण परिस्थिती निर्माण झालीय. ११ लोकांचा मृत्यू झालाय आणि राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन बसलेत. राज्यातल्या जनतेनं या सरकारचं नेमकं काय घोडं मारलंय,’ असा सवाल धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विट केले आहे.

 

काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानं पुण्यासह आसपासच्या परिसराची दैना झाली आहे. अनेक संसार रस्त्यावर आले आहेत. गायी-गुरे वाहून गेली असून मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. मात्र, सरकारी पातळीवर याबद्दल फारशी हालचाल दिसलेली नाही. यावरून मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर तोफ डागली आहे. ‘पुण्यात बिकट परिस्थिती आहे. मात्र, तेथील नागरिकांना दिलासा देण्याऐवजी, मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन बसले आहेत. मुख्यमंत्र्यांना फक्त निवडणुकांची काळजी आहे. जनतेबद्दल कळवळा नाही का? पश्‍चिम महाराष्ट्रातील पुराच्या वेळीही मुख्यमंत्र्यांनी हेच केलं होतं,’ असा आरोप त्यांनी केला आहे. प्रशासनानं पुण्यात अधिक लक्ष द्यावं आणि नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

दरम्यान पुण्यात बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने हाहा:कार उडाला असून अनेक रस्ते व वस्ते पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे घाबरलेल्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. आतापर्यंत रौद्र रूप धारण करत पावसाने एकूण ११ जणांचे बळी घेतल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त डी. वेंकटेशम यांनी दिली. रात्री अरण्येश्वर परिसरातील टांगेवाले कॉलनीत प्रथम पाच जणांचे मृतदेह आढळले. तर ३ ते ४ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, मृतांचा आकडा ११ वर पोहोचला आहे.

Leave a Comment