राष्ट्रपती राजवटीने आम्हाला निवांत केलं, आता बघतो काय करायचं ते – शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसची रंगतदार बॅटिंग पहायला मिळाली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेससोबत असलेल्या आपल्या भूमिकांची माहिती देत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अधिकृतरित्या मागितलेल्या पाठिंब्याची माहिती दिली. यावेळी पाठिंबा द्यायचा तर सांगोपांग चर्चा गरजेचं असल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आज चर्चा केल्याचं पटेल पुढं म्हणाले.

काँग्रेसचे नेते वेणूगोपाल यांनी राष्ट्रपती राजवटीचा निषेध केला. सर्वोच्च न्यायालायाच्या निर्णयाचा आदर न करताच राष्ट्रपती राजवटीची भीती दाखवून केंद्र सरकार हुकुमशाही दाखवत असल्याचं वेणूगोपाल म्हणाले. शिवसेनेला पाठिंब्यासाठी राष्ट्रवादीशी महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी एकाच दिवसाचा वेळ कसा काय दिला असा सवालही वेणूगोपाल यांनी विचारला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा द्यायचा ठरलं तर किमान समान कार्यक्रम काय असावा याबाबत चर्चा होणं गरजेचं असल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले. या चर्चेचा एकूण सूर शिवसेनेसोबत वाटाघाटी करण्याकडे दिसून आला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली असली तरी पुन्हा बहुमत सिद्ध करण्याची तयारी कोणत्या पक्षाने दाखवली तर राज्यपालांना राष्ट्रपती राजवट बरखास्त करावी लागणार आहे. एकूणच आम्ही टिकाऊ सरकार देण्यासाठीच चर्चेला वेळ घेत असल्याचं वेणूगोपाल आणि शरद पवार यांनी सांगितलं.

Leave a Comment