राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी जयंत पाटील यांची निवड

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार यावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटनीस पदी नियुक्ती करण्यात आल्याने आता राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची राजकीय वर्तुळामधे उत्सुकता वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभरातील पदाधिकार्यांची बैठक २९ एप्रिल रोजी पुण्यामधे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत नवनिर्वाचीत प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांची नावे प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेली खासगी बैठकीमधे प्रदेशाध्यक्ष पदासाठी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. परंतु प्रदेशाध्यक्ष पदाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook