शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद प्रतिनिधी – शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात अकलूज पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला होता. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील समर्थक सतीश दंडनाईक यांनी ओमराजे यांच्यासह 11 जणांवर गुन्हा नोंद केला होता. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरज कोर्टाने जामीन मंजूर केला असून शिवसेना खासदार ओमराजेंसह हींम्मतराव पाटील, रवी पाटील यांचा जामीन मंजूर करण्यात आला असल्याचे जय राजे निंबाळकर यांनी सांगितले.

कळंब पंचायत समिती सभापती निवडीवरून मारहाण केल्याची तक्रार उस्मानाबाद जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक यांनी दिल्यानंतर ओमराजे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दरम्यान भाजप आमदार राणा पाटील यांच्यावर देखील हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद असून ते फरार आहेत तर सतीश दंडनाईक यांच्यासह अन्य 3 आरोपी न्यायालयीन कोठडीत जेल मध्ये आहेत.

Leave a Comment