संजय राऊत लिलावतीतूनच सोडतायत शब्दांचे बाण, कोणाला लिहितायत पत्र?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी राऊत यांनी मागील आठवडाभर जबाबदारीची भुमिका घेत सेनेची बाजू लावून धरली आहे. मात्र सोमवारी छातीत दुखत असल्याने राऊत लिलावती रुग्नालयात दाखल झाले होते.

राऊत रुग्नालयात दाखल झाल्यानंतर राज्यभर त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांची भेट घेतल्यानंतर त्यांची तब्बेत ठिक असून चिंतेचे कारण नाही अशी माहिती दिली आहे. अशात राऊत यांचा लिखाण करतानाचा एक फोटोही प्रसारमाध्यामात आला असून राऊत यांच्या लढवय्यापणाचं सोशल मिडियातून कौतुक होत आहे. मात्र याचसोबत राऊत दवाखान्यात बॅडवर बसून काय बरे लिहित असतील याबाबत उत्सुकता व्यक्त होत आहे.

दरम्यान संजय राऊत यांना उद्या बुधवारी लिलावतीतून डिसार्ज मिळणार असल्याचे समजत आहे. सोमवारी रात्री राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळून आले आहेत.

Leave a Comment