हेल्मेट सक्तीच्या पहिल्याच दिवशी ६६ वाहने ताब्यात, वाहन चालक गोंधळले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने शुक्रवारी, एक नोव्हेंबरपासून सोलापुरात हेल्मेट न घालणाऱ्यांवर, सीटबेल्ट न लावणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे वाहन चालक मोठे गोंधळलले दिसत आहेत. पहिल्या दिवशी शहरातील विविध चार ठिकाणी झालेल्या कारवाईमध्ये हेल्मेट न वापरलेल्या २५३ वाहनचालकांवर तर सीट बेल्ट न लावलेल्या ३४ चारचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. ६६ वाहने ताब्यात घेण्यात आली.

हेल्मेटची सक्तीला शहरवासीयांनी कडाडून विरोध केला आहे. सोलापूर छोटे शहर असल्यामुळे शहरात हेल्मेटची सक्ती न करता शहराच्या बाहेर राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेटची सक्ती करण्यात यावी, असा सूर सोलापूरकरांचा होता. हेल्मेट सक्तीच्या विरोधात सोलापूर शहरातील सामाजिक संघटनांनी आवाज उठविला होता, परंतु पोलिस व आरटीओने आपली कारवाई सुरू ठेवली होती. सोलापूरकरांच्या मते मार्चअखेर आल्यानंतर आणि कोणत्याही प्रकारचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी पोलिस व आरटीओकडून हेल्मेट सक्ती करून कारवाईचा बडगा उचलला जातो आणि टार्गेट पूर्ण झाल्यानंतर कारवाई थंड पडते.

सोलापूरकरांनी अनेकदा या कारवाईचा अनुभव घेतलेला आहे. हेल्मेट सक्ती सुरू होणार म्हटल्यानंतर हेल्मेट विक्रीची दुकाने रस्त्यांवर थाटली गेली आहेत. मानांकन नसलेली, कमी दर्जाची हेल्मेट डोक्यावर घालून हेल्मेट सक्तीपासून बचाव केला जात आहे.

Leave a Comment