असा साजरा केला जातो गौरीचा सण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

#गणेशोउत्सव२०१९ | गणेश चतुर्थीच्या या उत्सवात गौरींना अनन्य साधारण महत्व असते. संस्कृत शब्दकोशातील अर्थानुसार गौरी म्हणजे ८ वर्षाची आनाधात्रात अशी पवित्र कन्या तसेच गौरी म्हणजे पृथ्वी, वरुण पत्नी, तुळशीचे झाड, मल्लिका उर्फ जाईची वेल हे अर्थ देखील कोशात दिले आहेत. या आधारेच तेरड्याच्या फुलाची ही गौरी म्हणून पूजा केली जाते.

भाद्रपद महिण्यात येणाऱ्या गौरीचे पूजन करुन अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्रिया हे व्रत करतात. या गौरीचे पूजन हे महाराष्ट्रातल्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. काही ठिकाणी या गौरींना लक्ष्मी देखील म्हंटल जात. अनुराधा नक्षत्रावर जेष्ठ गौरींचे आवाहन जेष्ठ नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर त्यांचे विसर्जन असे हे ३ दिवसांचे मूळ व्रत आहे. यालाच जेष्ठ गौरींचे पूजन असे म्हंटले जाते. काही गावात या गौरी सोन्याचांदीचे किंवा पितळाचे मुखवटे धारण करतात. गौरींच्या मूर्तीना चांगल्या साड्या नेसवून सुंदर दागिने घातले जातात. त्यामुळे या गौरी अत्यंत देखण्या दिसतात. तर काही ठिकाणी फक्त गौरींचे कागदावर चित्र काढून तिचे पूजन केले जाते.

अनेक गावात अशी प्रथा आहे कि नदीतील ५ दगड किंवा ५ छोटे खडे आणायचे आणि तेच पुजायचे तर अनेक ठिकाणी मातीचे लहान घट आणून त्यात हळद बांधलेला दोरा, खारीक खोबरे घालतात आणि ते घट एकावर एक ठेऊन ते गौरी म्हणून पूजतात.

गौराई आली सोन्याच्या पावली

गौरीचे घरात स्वागत करण्यासाठी तुळशी पासून ते घरातल्या पूजा स्थापनेच्या जागेपर्यंत रांगोळी, लक्ष्मीच्या हळदी कुंकवाच्या पावलाने रस्ता सजवला जातो. तेरडयाच्या पानाची गौर एका कुमारिकेला किंवा माहेरवाशिणीच्या डोक्यावर देऊन तिला गौरी मानून घरात घेतले जाते. ही गौर दारात आल्यानंतर लक्ष्मी आली सोनीच्या पावली असे म्हंटले जाते.त्यानंतर गौरीचे औक्षण करून तिला घरात घेतले जाते.

तिला सर्वप्रथम चूल दाखवली जाते. त्यानंतर संपूर्ण घर दाखून तिला पूजा स्थानावर स्थानापन्न केले जाते. या गौरीच्या सणाला नवीन लग्न झालेल्या मुली आवर्जून माहेरी येतात. माहेरी आलेली लेक आपल्या आईसोबत या गौरीची पूजा करते. आजच्या दिवशी या गौरींना पालेभाजी, भाकरी, ताकाची कढी, आणि वडी असा नैवद्य दाखवला जातो.

या गौराईच्या निमित्ताने महिलांचे अनेक खेळ रंगतात. रात्री उशिरापर्यंत जागून झिम्मा फुगडीचा खेळ रंगवला जातो. या खेळांमध्ये घागर आणि सूप खेळवण्याची प्रथा आहे. हिंदूंच्या सण आणि उत्सवाबद्दल लिहताना गौरीचा उल्लेख गनोबाची आई म्हणून केला जातो. गनोबाची आई महाराष्ट्रात सामाजिक स्थरात चांगलीच प्रसिद्ध आहे. तिचे आपल्या मुलावर आणि भक्तावरही खूप प्रेम आहे.

गवर गौरी ग गौरी ग, झिम्मा फुगडी खेळू दे
हिरव्या रानात, रानात गवर माझी नाचू दे

Leave a Comment