आता विधानसभा निवडणूकाही होणार ‘इको फ्रेंडली’ – जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर प्रतिनिधी। सध्या ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येने संपूर्ण जग त्रासलेले असताना राज्यातील आगामी विधानसभा निवडणूका देखील पर्यावरण पूरक होण्यासाठी निवडणूक आयोगाने सकारात्मक पाऊल उचलले आहेत. लातूर शहरामध्ये याची सुरुवात होणार आहे.

‘विधानसभेच्या उमेदवाराने प्रचारा दरम्यान हारतुऱ्यां ऐवजी झाडे भेट दिल्यास उमेदवारांच्या निवडणूक खर्चात सवलत देण्यात आली असून एका झाडाला केवळ एक रुपया खर्च गृहीत धरला जाणार आहे. हारतुरे केवळ फेकून दिले जातात तर झाड भेट दिल्यास त्यातून किमान राज्यात वृक्ष संवर्धन होण्यास मदत होणार असल्याने आता आयोगाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

उमेदवारांच्या खर्चाच्या दरात कपात केल्याने आता उमेदवार देखील पर्यावरण पूरक साहित्य प्रचारा दरम्यान वापरतील अशी आशा असल्याचे लातूर चे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी स्पष्ट केले आहे. तेव्हा भारतीय लोकशाहीमध्ये निवडणुकांना उत्सवाचा दर्जा प्राप्त होत असताना इतर पारंपरीक सण-उत्सव ‘इको फ्रेंडली’ साजरा करण्यावर शासन काम करत असतांना. निवडणुकी सारख्या मोठ्या उत्सवाला इको फ्रेंडली करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने उचलेले झाडांबद्दलचे पाऊल खरोखरच स्वागताहार्य आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत हे उदाहरण राबविल्यास नक्कीच पर्यावरण संवर्धनाला हातभार लागेल अशी अशा बाळगण्यास हरकत नाही.

Leave a Comment