उद्धवसाहेब, हा खेकडा शिवसेना पोखरतोय, वेळीच नांग्या मोडा; तानाजी सावंतांविरोधात निष्ठावंत शिवसैनिकाची पोस्टरबाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर | उद्धवसाहेब हा खेकडा तर शिवसेना पोखरतोय, वेळीच नांग्या मोडा अशी मागणी एका निष्ठावंत शिवसैनिकाने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात एका निष्ठावंत शिवसैनिकाने ही पोस्टरबाजी केली आहे. उद्धव साहेब हा खेकडा तर सोलापूर व धाराशिवची शिवसेना पोखरत आहे.. वेळीच नांग्या मोडा – निष्ठावंत शिवसैनिक,” असे वाक्य असलेले पोस्टर सोलापुरात लावण्यात आले आहे.

तानाजी सावंत फडणवीस सरकारमध्ये जलसंधारण व पाटबंधारे खात्याचे मंत्री असताना तिवरे धरण खेकड्यांनी फोडले असल्याचे अजब स्पष्टीकरण दिले होते. त्यावेळेस त्यांचे हे वादग्रस्त विधान चांगलेच गाजले. या घटनेचा संदर्भात शिवसैनिकाने हे पोस्टर लिहिले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न दिल्याने आमदार तानाजी सावंत नाराज आहेत. त्यांची नाराजी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणुकीत दिसून आली. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नाराज असलेल्या तानाजी सावंत यांनी बंडखोरी केल्यामुळे भाजपची सत्ता आली. तानाजी सावंत यांनी भाजपला सोबत घेऊन स्वतःच्या पुतण्याला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद मिळवून दिले. नाराज असलेल्या तानाजी सावंत यांनी आता निष्ठवंत शिवसैनिकाची नाराजी ओढवून घेतली आहे.

Leave a Comment