कागदावर लिहीलेलं भाषण वाचून उदयनराजेंचे शरद पवारांना अडखळत प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवारचा दिवस शेवटचा आहे. अनेक पक्षांनी वेगवेगळ्या पद्धती वापरून मतदारांवर आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सातारा जिल्ह्यात विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक सुद्धा होत आहे. उदयनराजे विरुद्ध श्रीनिवास पाटील अशी लढत या ठिकाणी चांगलीच रंग पकडत असल्याचं पहायला मिळत आहे. आज कराड येथे प्रचाराच्या सांगता सभेत मात्र उदयनराजे काहीसे चिंतीत अवस्थेत पहायला मिळाले.

साताऱ्यात शुक्रवारी भरपावसात शरद पवारांनी घेतलेल्या सभेचा चांगलाच परिणाम राज्यभर पहायला मिळाला. आता उदयनराजे भोसले यांनी कागदावर लिहीलेलं भाषण वाचून शरद पवारांना अडखळत प्रत्युत्तर दिलंय. २०१९ च्या लोकसभेसाठी उदयनराजेंना तिकीट देऊन मी चूक केल्याचं शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यासाठी उदयनराजे यांनी भाषण लिहून आणलं होतं. हे भाषण वाचतानाही उदयनराजे कमालीचं अडखळत असल्याचं पहायला मिळालं. शरद पवारांवर नेमकी काय टीका करावी हेच त्यांना समजत नसल्याचं एकूण भाषणावरून स्पष्टपणे जाणवून येत होतं.

भाषणाच्या शेवटी त्यांनीच माझ्या मोडक्या तोडक्या भाषणातून तुम्हाला जे कळालं त्यावर तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला आणि अतुल भोसलेंना साथ द्या. भाजपच्या विकासाला साथ द्या असं भावनिक आवाहन उदयनराजे यांनी शेवटी केलं.

शरद पवारांना प्रत्युत्तर देताना उदयनराजे अडखळले

Leave a Comment