काय होते माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे ‘व्हिजन 2020’? भारत महासत्ता झाला आहे का? वाचा सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र : 1999 हे वर्ष संपून 2000 हे नवीन वर्ष सुरू होणार होते, त्यावेळी जगभरात मोठा उत्साह होता. कॅलेंडरमधील वर्षाचे आकडे पूर्णत: बदलत असल्याच्या घटनेचे आपण साक्षीदार बनत असल्याच्या भावना, त्या उत्साहात अधिक होत्या. नवीन सहस्रक ( मिलेनियम गोल्स) खरे तर 2001 मध्ये सुरू होणार होते; परंतु त्याची सुरुवात 2000 मध्येच अनेकांनी केली होती. याच सुमारास ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी वाय. एस. राजन यांच्यासह ‘इंडिया 2020 : ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनिअम’ हे पुस्तक लिहून 2020 पर्यंतच्या विकासाचे उद्दिष्ट गाठण्याचे मिशन मांडले. हे मिशन प्रसिद्धीस पावले. 2020 या नव्या वर्षात पदार्पण करताच भारत महासत्ता झाला आहे की नाही या संदर्भात सोशलमिडीयावर चर्चा सुरु झाल्या आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हे प्रमुख उद्धिष्ट

हे मिशन राबविण्यासाठी कलाम यांनी देशभरात हजारो सेमिनार आणि सभा घेतल्या आणि त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचा प्रयत्न केला. तसे, ‘इंडिया व्हिजन 2020’ हे तंत्रज्ञान माहिती, अंदाज आणि मूल्यांकन परिषद (टीआयएफएसी) ने तयार केलेले दस्तऐवज होते, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, कलाम यांच्या अध्यक्षतेखाली 500 तज्ञांची टीमने हे दस्तऐवज तयार केले.

2020 पर्यंत भारताला नॉलेज सुपरपॉवर बनवण्याचे स्वप्न

कलाम यांनी या बहुचर्चित इंडिया 2020 या पुस्तकात लिहिले की, देशाला विकसित राष्ट्र म्हणून रुपांतर करण्यासाठी पाच क्षेत्रात काम करणे आवश्यक आहे. हे क्षेत्र शेती व अन्न प्रक्रिया, ग्रामीण भागात शहरी सुविधा आणि सौर ऊर्जा, शिक्षण आणि आरोग्य सेवा, सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान, तंत्रज्ञान आणि अणु तंत्रज्ञानाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या सामरिक उद्योगांचे होते. या पुस्तकात त्यांनी 2020 पर्यंत भारताला नॉलेज सुपरपॉवर आणि विकसित देशात रूपांतरित करण्यासाठी कृती योजना विकसित करण्यावर भर दिला आहे. त्यांनी या पुस्तकात भारताचा अण्वस्त्र कार्यक्रम हा भविष्यातील महासत्तेसाठी आवश्यक असल्याचे वर्णन केले आहे.

या मिशनसाठी कलाम शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत

राष्ट्रपती पदाचा कालावधी संपल्यानंतर दोन वर्षांतच 1 लाख विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना भविष्यासाठी तयार करण्याचे त्याचे ध्येय होते. तथापि, दोन वर्षांनंतरही त्यांनी या कार्याचा विस्तार सुरू ठेवला आणि शेवटपर्यंत ते या कार्यासाठी कटिबद्ध होते.

अब्दुल कलाम यांचे भारताला महासत्ता बनवण्याचे हे स्वप्न अजून तरी पूर्ण झाले नसल्याचे सध्याच्या परिस्थिती वरून दिसत आहे. अब्दुल कलाम यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आजच्या तरुणाईवर आहे.

Leave a Comment