काश्मीरचं वादळ आज महाराष्ट्राला धडकणार; नामग्याल विरुद्ध ठाकरे जुगलबंदी रंगणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी। पुण्यात आज राजकीय धुमश्चक्री होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मंगळवारीच पुण्यात दाखल झाले आहेत. उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचं उद्घाटन केल्यानंतर आज राज ठाकरेंची सभा आज पुण्यात होत आहे. दुसरीकडे चंद्रकांतदादा पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत ज्यापद्धतीने भाजपने बालाकोट मुद्दा उपस्थित केला होता, त्याच धरतीवर विधानसभा निवडणुकीत काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. लडाखमधील जामयंग त्सेरिंग नामग्याल या खासदाराला सोबत घेत भाजपच्या वतीने पुण्यात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

लोकसभा निवडणुकीत “लाव रे तो व्हिडियो” असं म्हणत विरोधकांची पोलखोल करण्याचं काम राज ठाकरेंनी केलं होतं. ईडी चौकशी झाल्यानंतर राज ठाकरे थोडे शांत झाले होते. आज त्यांची तोफ धडाडणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे. राज ठाकरे यांची सभा ९ ऑक्टोबर रोजी पुण्याच्या बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मैदानावर संध्याकाळी ६ वाजता सुरु होणार आहे. या सभेसाठी मनसे सैनिकांसोबत मित्रपक्षांनीही जय्यत तयारी केली असून आज राज ठाकरे काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

स्थानिक प्रश्नांच्या मुद्द्यावर निवडणूक लढणं गरजेचं असतानाच भाजपचे पुण्यातील कार्यकर्तेसुद्धा काश्मीर प्रश्नाच्या मांडणीसाठी घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले आहेत. नामग्याल यांची सभा म्हात्रे पूलाजवळील सिद्धी हॉल येथे साडेचार वाजता होणार आहे. एकूणच दोन्ही सभांच्या वेळेचा विचार करता राज ठाकरेंच्या नव्या महाराष्ट्राला धडकायला येणारं काश्मीरचं वादळ कितपत प्रभावी ठरणार हे बुधवारी रात्रीच समजणार आहे.

इतर काही बातम्या –

 

 

 

Leave a Comment