चंद्रपूर विधानसभेसाठी काँग्रेस कडून ‘या’ शिवसैनिकाला उमेदवारी निश्चित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर प्रतिनिधी | चंद्रपूर विधानसभेसाठी काँग्रेस कडून किशोर जोरगेवार यांचे नाव निश्चित झाले आहे. दिल्ली येथे जोरगेवार यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये जोरगेवार यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जोरगेवार यांनी शिवसेनेच्या तिकिटावर चंद्रपूर विधानसभा लढवली होती. यावेळी जोरगेवार यांना ५२ हजार मते मिळाली होती.

जोरगेवार यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे जिल्ह्यात शिवसेनेला धक्का बसला आहे. काँग्रेस प्रवेशानंतर आता जोरगेवारांना मतदारांचा काय कौल मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment