जंगलात लागलेली आग विझवताना अग्निशमन कर्मचाऱ्याचा मृत्यू; ऑस्ट्रेलियातील चिमुरडीचा फोटो होतो व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियात जंगलात लागलेल्या आगीमध्ये अनेक प्राणी मृत्युमुखी पडले. ही आग विझविण्यासाठी ऑस्ट्रेलियातील अग्निशमन दिल्याने शर्थीचे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर पावसाची साथ मिळाली आणि आग विझली. मात्र ही आग विझवताना अग्निशमनच्या दलातील कर्मचाऱ्याला प्राण गमवावे लागले. आग विझवतना झाड पडल्यामुळे अँड्र्यू ऑडॉयर या फायर फायटर मॅनचा मृत्यू झाला. त्यांच्या या मृत्यूनंतर त्यांच्या मुलीचा एक फोटो व्हायरल होतोय. या चिमुरडीचे नाव शेर्लोट ऑडॉयर. तिच्याजवळ मागच्या बाजूस दिसणाऱ्या शवपेटीत तिच्या प्रिय वडिलांचे पार्थिव ठेवलेलं आहे.

मंगळवारी अँड्र्यू ऑडॉयर यांचा अंत्यविधी झाला तेंव्हा ही चिमुरडी तिथं उपस्थित होती. शवपेटीवर ठेवलेलं आपल्या पित्याचे हेल्मेट तिने नकळत उचलून घेतलं आणि आपल्या डोक्यावर ठेवलं. वणवा विझवण्यासाठी प्राणाची बाजी लावून हौतात्म्य पत्करलेल्या पित्याचे हेल्मेट परिधान करून ती सहजतेने इकडे तिकडे वावरू लागली तेंव्हा उपस्थित फायरमेन्सचे डोळे पाणावले.

तिच्या वडिलांना प्रदान करण्यात आलेले मेडल तिला लावण्यात आले. FIRE.jpg

 

Leave a Comment