जालन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन, पवारांवरील गुन्ह्याचा निषेध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना प्रतिनिधी। शरद पवार यांच्यावर राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी ईडी ने दाखल केलेल्या गुन्हयाचे पडसाद राज्यभर पडताना दिसत आहेत. शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ईडी ने दाखल केलेल्या गुन्हयाचा राष्ट्रवादीकडून जाहीर निषेध करत जालन्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

भाजप सरकार सूडबुद्धीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्यावर गुन्हे दाखल करत आहे असा आरोप करत राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे करून जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे. जालन्यातील बदनापूर येथील नगरपंचायत समोर औरंगाबाद जालना रोडवर कार्यकर्त्यांनी पुतळा दहन करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केलीये. तसेच शरद पवार ‘तुम्ही संघर्ष करा आम्ही सोबत आहोत’, ‘या सरकारचे करायचे काय खाली मुडके वर पाय’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. दरम्यान मुख्य रस्त्यावरच कार्यकर्त्यांनी हा पुतळा दहन केल्याने महामार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली.

मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच गुन्हा कसा काय दाखल होतो याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सवाल करत असताना या कारवाई बाबत कार्यकत्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. हे आंदोलन आता तीव्र होण्याचे संकेत या निर्र्शनांनी दिले आहेत. तसेच पवारांवर दाखल झालेला गुन्हा हा निवडूणुक प्रचाराचा विषय ठरणार यात शंका नाही.

Leave a Comment