जितेंद्र आव्हाडांनी संजय राऊत यांना दिल्या वाढदिवसाच्या सुरेल शुभेच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । सत्तास्थापनेसाठी शिवसेना-राष्ट्रवादीचे सूर जुळताना दिसत आहेत. या नव्याने जुळणारणाऱ्या सुरांचा प्रत्यय आज संजय राऊत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना शुभेच्छा देण्यासाठी सुरांचा सहारा घेतला. आव्हाड यांनी खास आपल्या शैलीत गाणे म्हणतं राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला.

याबाबतचा एक विडिओ आव्हाड यांनी तयार करत संजय राऊत यांना आजच्या घडील जर कुठलं गाणं शोभेल असं व्हिडिओत विचारलं. मात्र या प्रश्नाचं उत्तर त्यांनी स्वतःच देत सुप्रसिद्ध गाणं, ‘तेरी गलियों में ना रखेंगे कदम आज के बाद’ हे गाणं आपल्या आवाजात राऊत यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने गायले.

गेल्या अनेक दिवसांपासून सेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सत्तास्थापने बाबतीत बैठका सुरू आहेत. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर आज आव्हाड यांनी राऊत यांची भेट घेतली. त्यातच योगायोगाने राऊत यांचा वाढदिवस होता.

पहा विडिओ-

आव्हाडांच्या काव्यमय शैलीत संजय राऊतांना शुभेच्छा

Leave a Comment