‘जे जिवंत असतात तेच प्रवाहाच्या विरुद्ध जातात…मेलेले प्रवाहा सोबत वाहून जातात’ – नवाब मलिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । ‘जो जिंदा होते हैं वह प्रवाह के विरूद्ध तैरते हैं, मुर्दा लोग पानी के साथ बह जाते हैं। साथियों जिंदा हो तो जिंदा नज़र आना ज़रूरी है। ‘ अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष व माजी मंत्री सचिन अहीर यांच्या पक्षांतरावर टिपण्णी केली आहे.

आज भाजपाची केंद्रात दुसऱ्यांदा व इतर राज्यात सत्ता आहे, त्यामुळे आपणही ह्या प्रवाहत शामिल होऊन सत्तेचा भाग व्हायच, त्यांच्या विरोधात उभे न राहता त्यांच्या सोबत उभे राहायचं, अशी वृत्ती आज वाढलेली दिसत असतांना मलिक यांची आजची टिपणी महत्वाची व राजकीय वर्तुळात चर्चेची विषय ठरत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांतील बहुतांश नेते सध्या आपआपलं राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यात गुंतले आहेत. त्यामुळे सध्या अनेक नेते हे शक्य तितक्या लवकर पक्षांतर करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाला मोठा तोटा होणार आहे.

पक्षांतरामुळं शिवसेनेचं तसेच भाजपचे बळ राज्यात आणखीनच वाढणार असून येत्या निवडणुकीत राज्यात विरोधी पक्ष नामशेष होण्याच्या स्थितीत असेल. येत्या आठवड्यात पच्छिम महाराष्ट्रातील काही आणखीन बडे नेते पक्षांतर करण्याची जोरदार चर्चा आहे.

हे पण वाचा –

शरद पवारांसाठी ‘या’ १३ व्यक्ती आहेत खास; अजित पवारांचा समावेश नाही!

मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या विनोद पाटलांना हा पक्ष बनवणार आमदार

लक्ष्मण मानेंनी केली नव्या राजकीय पक्षाची घोषणा ; काँग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत

या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढणार !

आणि रोहित पवारांनी त्याच्या हट्टापायी सलूनमध्ये केली कटींग!

म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-वडिलांचा फोटो

अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Leave a Comment