ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था | माजी कायदामंत्री,ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे प्रदीर्घ आजाराने दिल्लीतील राहत्या घरी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या दोन आठवड्यापासून ते आजारी होते. देशातील सर्वोत्कृष्ट विधीज्ञांमध्ये त्यांची गणना होत असे. जेठमलानी यांच्या पश्चात मुलगा वकील महेश जेठमलानी आणि मुलगी असा परिवार असून, मुलगी अमेरिकेत राहते. त्यांची दुसरी मुलगी राणी जेठमलानी यांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने ज्येष्ठ विधिज्ज्ञ आणि कायद्याचा अभ्यासक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

जेठमलानी यांचे पूर्वाआयुष्य

जेठमलानी यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या बॉम्बे प्रातांतील सिंध विभागात १४ सप्टेंबर १९२३ रोजी झाला होता.  वयाच्या १८ व्या वर्षी जेठमलानी यांनी एल.एल.बी ची पदवी घेतली. शाळेत शिकत असताना बढती मिळवत वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी मॅट्रिक्युलेशन उत्तीर्ण केले. त्या काळात सर्वसाधारणपणे लोक वयाच्या २१ व्या वर्षी वकील बनत असत. मात्र जेठमलानी यांनी ही कमाल १८ व्या वर्षीच करून दाखवली.

जेठमलाईनी आणि त्यांचे चर्चित खटले

१९५९ मध्ये लढलेल्या के.एम. नानावटी विरूद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्याने जेठमलानी यांचं नाव चर्चेत आलं. हा खटला त्यांच्या आयुष्यातील पहिला महत्त्वाचा खटला होता. त्यानंतर राम जेठमलानी यांनी राजीव गांधी हत्येतील आरोपींची बाजू मद्रास उच्च न्यायालयात मांडली. याबरोबर इंदिरा गांधी यांच्या हत्येतील आरोपींची बाजूही त्यांनी मांडली होती. स्टॉक मार्केट घोटाळ्यातील हर्षद मेहता व केतन पारेख यांचे वकील म्हणून त्यांनी काम केले. जेठमलानी यांनी संसदेवरील हल्ल्याप्रकरणातील आरोपी अफझल गुरू तसेच गुजरातमधील सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात अमित शाह यांचा खटला लढवला होता. जेसिका लाल खून प्रकरणात मनू शर्मा यांची बाजू जेठमलानी मांडली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षपदीही जेठमलानी यांची २०१०मध्ये निवड झाली आली होती.

विधिज्ञ ते राजकरणी

सन २०१० मध्ये जेठमलानी यांनी सुप्रिम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूकही लढवली होती. सहाव्या आणि सातव्या लोकसभेत ते भाजपच्या तिकिटावर मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय कायदामंत्री आणि नगरविकास विभागाचे मंत्रिपद भूषविले होते. सन २००४ मध्ये त्यांनी लखनऊमधून अटलबिहारी वाजपेयी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

Leave a Comment