नंदुरबार जिल्हा परिषदेत काँग्रेस, भाजपला समसमान जागा; सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नंदुरबार : राज्यात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. या निकालावरून शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी या पक्षांच्या महाविकास आघाडीला यश मिळताना दिसत आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि भाजपला समसमान जागा मिळाल्या आहेत. राज्यात बदललेल्या सत्ता समीकरणाचा परिणाम जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर होणाऱ्या सत्तास्थापनेतही दिसण्याची शक्यता आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेत भाजपला सर्वाधिक २३ तर काँग्रेसला २३ जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला ७ तर राष्ट्रवादीला ३ जागा मिळाल्या आहेत. या आकडेवारीमुळे आणि राज्यात बदललेल्या सत्ता समीकरणामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता येणार का नाही हे शिवसेनेच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे. तोरणमाळ गटातून मंत्री केसी पाडवी यांच्या पत्नीचा पराभव शिवसेनेच्या उमेदवाराने केला आहे.

काँग्रेस आणि भाजपला समसमान जागा मिळाल्याने सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हाती गेल्या आहेत. शिवसेना कॉंग्रेसला साथ देणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. शिवसेना काँग्रेस सोबत गेल्यास महाविकास आघाडीची सत्ता जिल्हा परिषदेवर येणार आहे.

Leave a Comment