नरेंद्र मोदींची सपा – बसपा युती वर घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आजमगड| दोन दिवस उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सपा – बसपा युतीवर घणाघाती टीका केली आहे. ‘ज्यांना एकमेकांचे तोंड बघू वाटत नव्हते ते आता युती करून भाजपाशी लढू पाहत आहेत’ असे मोदींनी म्हटले आहे. ‘मोदी आपली दुकाने बंद करून टाकेल’ अशी सपा आणि बसपा ला भिती वाटत आहे असेही मोदी यावेळी म्हणाले आहेत.
आजमगडमध्ये पूर्वांचल एक्सप्रेस वे ची कोनशील बसवण्याचा सोहळा मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी मोदी बोलत होते. ‘बाबासाहेब आंबेडकर आणि राम मनोहर लोहिया यांची नावे घेऊन उत्तर प्रदेशमध्ये राजकारण केले पण त्यांचे विचार त्यांच्या कृतीत उतरले नाहीत’ असा आरोप मोदी यांनी सपा आणि बसपा यांच्यावर एकत्रित केला. आजमगड या मुलायमसिंग यादव यांच्या बालेकिल्ल्यातून मोदींनी २०१९ च्या लोकसभेची राळ उडवून दिली आहे.
तिहेरी तलाकच्या मुद्यावर कॉग्रेसने सहकार्य दिले नाही कारण त्यांना मुस्लिम महिलांचे दुःख कमी करायचे नाही असा ठपका कॉग्रेसवर ठेवून मोदींनी पुन्हा एकदा विकासाच्या मुद्द्यावर साद घातली. मोदींच्या आजच्या भाषणांतून २०१९च्या लोकसभेचा रोख स्पष्ट दिसून येत होता.

Leave a Comment