नांदेडमध्ये भाजपकडून विधानसभेच्या १० जागांसाठी १०० उमेदवार इच्छुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नांदेड प्रतिनिधी | विधानसभेसाठी ईच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी भाजपकडे मोठी भाऊगर्दी होतांना दिसत आहे. गुरुवारी नांदेड जिल्ह्यामध्ये राज्यमंत्री रणजीत पाटिल यांनी भाजपाकडुन ईच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. नांदेडच्या 9 विधानसभेच्या जागांसाठी 100 हुन अधिक ईच्छुकांनी मुलाखत दिली. 2014 पुर्वी भाजपाकडे ईच्छुक उमेदवारांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. आता मात्र राज्यासह देशभरात भाजपचे वातावरण असल्यामुळे भाजपमध्ये आमदार बनण्यासाठी भाऊगर्दी दिसत आहे.

एका जागेसाठी 10 पेक्षा अधीक ईच्छुक उमेदवार बाशिंग बांधुन तयार आहेत. विशेष म्हणजे भाजपाचा विद्यमान आमदार असलेल्या जागेवरही ईच्छुक केवळ मुलाखत देत नाहीत तर जोरदार फिल्डींग लावतानाही दिसत आहेत. भाजपाचे एकमेव आमदार असलेल्या तुषार राठोड यांच्यावरील नाराजीचा फायदा घेण्यासाठी सनदी अधिकारी असलेले रामदास पाटिल तिकिटासाठी लॉबींग करात आहेत. त्यांनी ऊमेदवारीसाठी मुलाखतही दिली आहे. एकुणच नांदेडमध्ये मोजके नेते आणि कार्यकर्ते असलेल्या भाजपाला आता अच्छे दिन आले आहेत.

Leave a Comment