चेहरा झाकलेल्या जमावाकडून जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर हल्ला; विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयेशा घोषसह विद्यार्थी गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : दिल्लीच्या प्रतिष्ठित अशा जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) खळबळ उडाली आहे. मास्क लावणाऱ्या काही लोकांनी जेएनयू कॅम्पसमधील विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेशा घोष गंभीर जखमी झाली आहे. इतर विद्यार्थीही गंभीर जखमी झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जवळपास 50 गुंड जेएनयू कॅम्पसमध्ये घुसले आणि विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यास सुरवात केली. त्यांनी चारचाकी गाड्यांना लक्ष्य केले आणि वसतिगृहांची तोडफोड केली. जेएनयूचे प्राध्यापक अतुल सूद यांनी सांगितले की, या हल्लेखोरांपैकी काहींनी वसतिगृहावर दगडफेक केली आणि विद्यापीठाच्या मालमत्तेचे नुकसान केले.

स्टुडंट्स युनियनचे अध्यक्ष आयेशा घोष म्हणाली की, त्यांनी चेहऱ्यावर मास्क घातला होता आणि त्यांनी हल्ला केला व मारहाण केली. या हल्ल्यात माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसते आहे की, जेएनयू कँपसमध्ये 50 हून अधिक लोक फिरताना दिसतात, ज्यांच्या हातात हॉकी स्टिक, रॉड आणि बॅट दिसत आहे. एबीव्हीपीने हा हल्ला केल्याचा आरोप डाव्या संघटनांनी केला आहे.

Leave a Comment