मुंबईत पुरस्तिथी, कुर्ल्यात १३०० जणांना हलवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
मुंबई प्रतिनिधी  | मुसळधार पावसामुळं मुंबई आणि उपनगरांत ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचलं आहे. मिठी नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. कुर्ला पश्चिमेकडील विमानतळ परिसरातील क्रांती नगर पाण्याखाली गेलं असून, एनडीआरएफच्या पथकानं बचावकार्य हाती घेतलं आहे. आतापर्यंत १३०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. मुंबई आणि उपनगरांत पावसाचा जोर वाढला आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. नदीकाठावरील भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कुर्ला पश्चिमेकडील विमानतळ परिसरातील क्रांती नगर पुन्हा पाण्याखाली गेलं आहे.
पावसाचा जोर कायम राहिला तर नदीचे पाणी वस्तीत घुसण्याची शक्यता असून, मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे. मुंबई महापालिका आणि एनडीआरएफचं पथक या भागात पोहोचलं असून, बचावकार्य हाती घेतलं आहे. एनडीआरएफच्या जवानांनी आतापर्यंत १३०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे.
दरम्यान, रायगडमध्येही मुसळधार पाऊस सुरू असून, कुंडलिका, अंबा, सावित्री आणि पातळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुण्यातून एनडीआरएफचे दोन पथक पनवेलमध्ये दाखल झाले आहेत. 
सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं विक्रोळी-कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे. त्यामुळं मध्य रेल्वेवरील ठाणे-मुंबई सीएसएमटी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ठाणे-कर्जत, ठाणे-कसारा दरम्यानची वाहतूक सुरू आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Leave a Comment