मुख्याध्यापकाचे अपहरण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड, प्रतिनिधी,नितीन चव्हाण : शाळेतील शिक्षकाला कर्तव्यावर असतांना अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शाम दशरथ वाघमारे, संतोष वाघमारे (रा.अंथरवन पिंपरी) याच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 30 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पिंपळनेर पोलीस ठाण्यात अंथरवन पिंपरी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव रंगनाथ तिडके यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,बीड तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथील शाम दशरथ वाघमारे हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत येवून विनाकारण व्हिडीओ चित्रण करणे, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, महिला शिक्षकांना मानसिक त्रास देवून अपमानीत करत असे. याप्रकरणी गावातील काही ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधिताला समजावून सांगूनही हे प्रकार थांबले नाही. उलट शाम दशरथ वाघमारे याने दिनांक 13 जानेवारी 2020 रोजी त्याचा साथीदार संतोष वाघमारे यांनी, शाळेत येवून चहा प्यायला चला, असे म्हणून बाहेर बोलावून घेतले. बाहेर उभ्या असलेल्या एम.एच.46 एपी 4322 या चारचाकीमध्ये जबरदस्तीने धमकावून बसविले आणि घेवून गेला. गाडीत बसल्यानंतर मारहाण करून मुलाचे अपहरण करीन, तसेच पोलिसात तक्रार दिली तर जीवे मारीन, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या.

दरम्यान अंथरवन पिंपरी ग्रामस्थ पाठलाग करीत असल्याचे पाहून मला गाडीतून खाली उतरविले. वाघमारे याने दिलेल्या धमकीमुळे मी घाबरलो असल्याने उशिराने तक्रार दिल्याचे मुख्याध्यापक सदाशिव रंगनाथ तिडके यांनी फिर्यादित नमूद केले आहे. यांसदर्भात पिंपळनेर पोलीस ठाण्यात 30 जानेवारी रोजी भादंवि कलम 353, 332, 363, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भूतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव सानप हे करत आहेत.

Leave a Comment