या देशाने दिला 70 हत्तींना ठार मारण्याचा आदेश,एका हत्तीची किंमत आहे 1,20,000…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हत्तींच्या वाढत्या लोकसंख्येमुळे त्रस्त असलेल्या बोत्सवाना या आफ्रिकन देशाने त्यांना ठार मारण्याची योजना आखली आहे. आफ्रिकेच्या या शहराने हत्तींना ठार करण्यासाठी लिलाव प्रक्रिया आयोजित केली आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, आफ्रिकेच्या बोत्सवानामध्ये सध्या हत्तींची संख्या १.३० लाखाहून अधिक आहे. यामुळे अनेकदा हत्तींमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. हत्तींनी मानवांना होणार्‍या समस्यांमुळे सरकारने त्यांना ठार करण्याचे आदेश दिले आहेत.बोत्सवानाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्राणी आणि मानवातील संघर्ष कमी करण्यासाठी शिकार करणे आवश्यक आहे. शेतात फिरणारे हत्ती अनेकदा शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान करतात आणि यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. हत्तींना ठार करण्यासाठीही किंमत लादली गेली आहे. हत्तींची शिकार करणार्‍या एजन्सी किंवा संस्थांकडून ही किंमत आकारली जाईल.

खरं तर, बोत्सवानाचे अध्यक्ष मोकवित्सी मासीसी यांनी ५ वर्षांपूर्वी हत्तीच्या शिकारवर बंदी घातली होती. तथापि, त्यांनी आता ती बंदी मागे घेतली आहे. बोत्सवानामधील हत्तींची संख्या प्रचंड वाढली आहे आणि यामुळे सरकारने पुन्हा एकदा त्यांना शिकार करण्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानंतर सरकार ७ एजन्सी किंवा संस्थेला १०-१० हत्तींची शिकार करण्यास परवानगी देईल. या सर्व संस्था किंवा एजन्सींना १० हत्तींच्या शिकारीसाठी १२ लाख रुपये द्यावे लागतील. म्हणजे हत्तीची किंमत १,२०,००० लावण्यात आली आहे.

Leave a Comment