शरद पवारांच्या हत्येचा कट आणि महाविकास आघाडी सरकार उलथून टाकण्याचे कारस्थान; पोलीस स्थानकात तक्रार दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे अद्यक्ष शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची तक्रार पुण्यातील शिवाजी नगर पोलीस स्थानकात दाखल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी ही तक्रार दिली असून महाविकास आघाडीचे सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हंटले आहे.

युटूबवरील पोस्टमन, थिंक टॅंक या चॅनेलवरील व्हिडिओच्या माध्यमातून पवारांविषयी द्वेष पसरवला जात आहे असे खाबिया यांचे म्हणणे असून या मागे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर, घनशाम पाटील हे लोक असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. सदर चॅनेलवरील भाषणे पाहिल्यास शरद पवारांना संपविले पाहिजे, बॉंब व गोळ्यांचा वापर केला पाहिजे अशी चिथावणीखोर वक्तव्ये केली जात असल्याचे खाबिया यांनी म्हंटले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून हे घडत आहे असेही त्यांनी तक्रारीत म्हंटले आहे. या प्रकरणाचा तातडीने तपास करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी खाबिया यांनी केली आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment