‘सरकार शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाही संडास देते’ – आमदार बच्चू कडू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गडचिरोली प्रतिनिधी। महाराष्ट्रात साडे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी पण सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देत नाही. कश्मीरसारखी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची भयावह परिस्थिती झाली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाही तर देते काय? संडास! अशी जळजळीत टीका प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर केली. चिमूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

बच्चु कडु उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत म्हणाले की, ‘विधानसभेत भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलायला कुणीच तयार होत नाही. चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात कंपनीचे टावर उभे केले. परंतु चिमूर विधानसभा क्षेत्रातील लोकप्रतिनिधी येथील शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यात असफल ठरले.

या शेतकरी मेळाव्याचे आयोजन आम आदमी पार्टी, शेतकरी संघटना, बीआर एसपी, ओबीसी मंच च्या वतीने आयोजित करण्यात आला होते. चिमूर शहरातील अभ्यकंर मैदानावरील या शेतकरी मेळाव्यात हजारोंच्या संख्येत शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Leave a Comment