सिंधुदुर्ग भाजपला राणे प्रवेश मान्य, अंतिम निर्णय भाजप प्रवेशावर कोअर कमिटी घेणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सिंधुदुर्ग प्रतिनिधी। नारायण राणेंच्या प्रवेशाबाबत आज भाजपाची मुबंईमध्ये कोअर कमिटी बैठक होणार आहे. राणेंच्या भाजपा प्रवेशावर या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे बोललं जातं आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत राणेंच्या प्रवेशाबाबत निर्णय होणार असून भाजपा शिवसेना युती होणार की नाही यावर देखील चर्चा होणार आहे. परंतु आत्तापर्यंत राणेंच्या प्रवेशाबाबत काहीच कल्पना नाही असे सांगणाऱ्या सिंधुदुर्ग भाजपला देखील आता नारायण राणेंचा प्रवेश मान्य असणार असल्याच भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार स्पष्ट केले.

ते म्हणाले की,’ जो निर्णय मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष घेतील तो आम्हाला मान्य आहे. माझी कालच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी फोन वर चर्चा झाली आहे, ते म्हणाले लवकरच युतीची घोषणा होईल. त्यानंतर कोअर कमिटीच्या बैठकीत नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत निर्णय घेण्यात येईल. भाजप प्रदेश कमिटी जो पण निर्णय असेल तो जिल्हा भाजप कमिटीला मान्य असेल.’ जे जसे येतील तसे त्यांना घ्या’. मात्र त्यांच्या प्रवेशाबाबत निर्णय पूर्ण अधिकार घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे भाजप प्रदेश कमिटीला आहे.’

सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या स्पष्टीकरणानंतर राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग स्थानिक पातळीवर सुकर झाला असे म्हणावे लागेल. मात्र युतीची घोषणा आणि भाजपच्या कोअर कमिटीचा निर्णय यावरचं नारायण राणे यांचा भाजप प्रवेशाचे भवितव्य अवलंबून आहे.

Leave a Comment