सोनू सूद ठरला संकटमोचक ; फिलिफिन्स मधील भारतीयांना आणले मायदेशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सोनू सूड लॉकडाउन मध्ये सर्वांसाठी संकटमोचक ठरला आहे. त्याने आत्तापर्यंत अनेक मजुरांना त्यांच्या घरी पोचवण्याच काम केलं.तसेच गरजूंना आर्थिक मदतही केली आहे. ज्यांना राहायला घर नाही त्यांना घर बांधून देण्याचं वचनही सोनू सूद ने दिल.सोनूने यापूर्वी किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना परत आणले होते. आता तो फिलिपिन्समध्ये अडकलेल्या लोकांना भारतात आणत आहे.सोनू ने स्वतः ट्विट करत ही बातमी दिली.

याबाबत सोनू सूद यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली. फिलिपिन्समधील लोकांचे फोटो त्याने रीट्वीट केले. या फोटोंमध्ये अनेक लोक विमानतळावर सतत दिसतात. हे फोटो शेअर करताना सोनू सूदने लिहिले की, ‘आपणा सर्वांना परत भारतात आणून मला आनंद झाला. मिशन फिलिपिन्सचा पहिला टप्पा पूर्ण झाला. आता दुसरा टप्पा सुरू होईल. जय हिंद. ‘

आगामी काळात सोनू सूद इतर देशांतील भारतीयांनाही परत आणनार आहे. फिलिपिन्सचा दुसरा टप्पा आता सुरू होईल, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. याशिवाय रशिया आणि उझबेकिस्तानमधील लोकांनाही परत आणले जाईल. याशिवाय सोनू सूद वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहे.

Leave a Comment