शेतकर्‍याने ऊसात केली गांजाची लागवड; पोलिसांकडून 18 लाखांचा 147 किलो ओला गांजा जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

जत तालुक्यातील उमराणी येथे उसाच्या शेतात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मल्लाप्पा बिराजदार या शेतकऱ्याच्या शेतावर छापा टाकून ओला गांजा जप्त केला. या शेतामध्ये तब्बल १४७ किलोची गांजाची झाडे लावण्यात आली होती. पोलिसांनी झाडे काढून तब्बल १७ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उमराणी हे गाव कर्नाटक बॉर्डरवर असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड होत असल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाचे उत्पादन होत असताना स्थानिक पोलिसांना याबाबत कल्पना नव्हती का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. यासाठी खास पथके तैनात करण्यात आली आहेत. जिल्हयात गांजाची लागवड करणाऱ्या व गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी कारवाई करण्यासाठी खास पथक तयार केले. मंगळवार दि. ०६ ऑक्टोबर रोजी जत विभागमध्ये पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, अच्युत सुर्यवंशी, राजेंद्र मुळे, जितेद्र मुळे, आमसिध्दा खोत, राजु शिरोळकर, महादेव धुमाळ, सचिन कुंभार, मुदतसर पाथरवट, राहुल जाधव, प्रशांत माळी हे शासकीय वाहनाने पेट्रोलिग करीत गांजाची लागवड करणा-या व गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तींची माहिती घेत होते. यावेळी पोलीस नाईक मुदतसर पाथरवट यांना माहिती मिळाली की, उमराणी गावामध्ये मल्लाप्पा ईरगोडा बिराजदार यांच्या ऊसाच्या शेतात गांजाची लागवड केली असल्याबाबत माहिती मिळाली.

मिळालेल्या माहिती प्रमाणे पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी उमराणी येथील मल्लाप्पा ईरगाडा बिराजदार यांच्या ऊसाच्या शेतात छापा मारुन शेतमालकास ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत यांनी त्याचे नाव गाव विचारता त्याने आपले नाव मल्लाप्पा ईरगोडा बिराजदार (वय ६५ रा. उमराणी ) असे सागितले. त्यावेळी बिराजदार यांच्या ऊसाच्या शेतात पंचासमक्ष पाहणी केली असता उसाच्या शेतात आंतरपीक म्हणून तब्बल १४७ किलो वजनाचा १७ लाख ७६ हजार रुपये किमतीच्या ओल्या गांजाची झाडे मिळाली. गांजाची झाडे सविस्तर पंचनाम्याने जप्त करुन आरोपी व मुदेमाल पुढील तपासकामी जत पोलीस ठाणे येथे देण्यात आला.

Leave a Comment