काश्मीर खोऱ्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा मात्र महाराष्ट्र पुत्राला वीरमरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था | काश्मीर खोऱ्यातील पुलवामाच्या बंडजू भागात सुरु असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मात्र त्यात एक भारतीय जवान शाहिद झाला आहे. सुनिल काळे अस या शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे.

दरम्यान आज पहाटे साडेचार वाजता पुलवामामध्ये अतिरेक्यांच्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगांवचे सीआरपीएफ जवान सुनिल काळे हे शहीद झाले आहेत. ही माहिती मिळताच संपुर्ण गाव गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद केलं आहे. काळे यांच्या मृत्यूची बातमी आल्याने बार्शी तालुक्यात शोककळा पसरली आहे.

मागील काही दिवसांपूर्वीच चीनने केलेल्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. ही बातमी जुनी होत नाही तोच आज पहाटे पुन्हा एक जवान शहीद झाला आहे. काळे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Comment