2020 हे लीप वर्ष; जाणून घ्या, लीप वर्ष म्हणजे काय? लीप वर्ष का निर्माण होते?

टीम, हॅलो महाराष्ट्र | नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत झाले आहे. या नवीन वर्षात एक दिवस जास्तीचा असणार आहे कारण 2020 हे वर्ष लीप वर्ष असणार आहे. लीप वर्षात फेब्रुवारी हा महिना 29 दिवसांचा असणार आहे. चला जाणून घेऊ या हे लीप वर्ष काय असतं?

ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे ज्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात 28 च्या ऐवजी 29 दिवस असतात. अशा वर्षाला लीप वर्ष असे म्हणले जाते. लीप वर्ष दर चार वर्षांनी येते.

लीप वर्ष का निर्माण होतं?

पृथ्वीला सुर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस 6 तास लागतात. आपण मात्र आपल्या सोयीसाठी वरचे 6 तास धरत नाही. दर 4 वर्षांनी या 6 तासाचे मिळून 24 तास होतात आणि एक दिवस वाढतो. एक दिवस वाढल्यामुळे लीप वर्षातील फेब्रुवारी महिन्यात एक दिवस वाढतो आणि फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा होतो. लीप वर्ष सोडले तर इतरवेळी फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा असतो.

कसे ओळखायचे लीप वर्ष?

जर एखाद्या वर्षाच्या आकड्यातील शेवटच्या दोन आकड्यांची संख्येला चारने पूर्णतः भागले जात असेल तर ते वर्ष लीप वर्ष असते. उदा. 2020 या आकड्यातील 20 ला 4 ने निःशेष भाग जातो.

हे पण वाचा –

नववर्षी गर्लफ्रेंड ला द्या हे गिफ्ट

काय आहे भीमा कोरेगावचा इतिहास? 1 जानेवारी 1818 रोजी असे काय घडले, ज्यामुळे लाखो दलित बांधव या ठिकाणी येतात? वाचा सविस्तर

पुण्यातील फर्ग्युसन रोडवर तरुणाईचे जंगी ‘सेलिब्रेशन’;  जल्लोषात केलं नवीन वर्षाच स्वागत

New Year Celebration 2020, न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियामध्ये सुंदर आतिषबाजी

नववर्ष 1 मार्च ऐवजी 1 जानेवारीलाच का साजरे केले जाते ?

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com