भारतीय वायुसेनेचा ८८ वा स्थापना दिवस ; राफेल, तेजससहित सुखोई देखील घेतंय भरारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज ८ ऑक्टोबर म्हणजेच भारतीय हवाई दलाचा वर्धापनदिन. ८८ वर्षांपूर्वी १९३२ साली आजच्याच दिवशी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली. मागील नऊ दशकांमध्ये भारतीय हवाई दलाने गरुड झेप घेतली आहे. भारताच्या गौरवशाली इतिहासाशी कार्यक्रमाला सुरुवात झालीय. चीन आणि पाकिस्तान असं दुहेरी आव्हान घेणारी वायुसेना आपल्या कामगिरीचे प्रात्यक्षिक दाखवत आहे. या कार्यक्रमात ५६ एअरक्राफ्टनी सहभाग घेतलाय. यामध्ये राफेल, जॅगुवार, तेजस सहीत सुखोई आणि मिराजचा देखील समावेश आहे.

वायुसेनेने रंगीत तालमीत आपल्या शक्ती प्रदर्शनाची झलक दाखवली आहे. यावेळी सर्व फायटर ५-५ च्या फॉर्मेशनमध्ये उड्डाण भरताना दिसणार आहेत. भारतीय वायुसेनेचा पराक्रम जगाने अनेकदा पाहीलाय. आज वायुसेना स्थापना दिनानिमित्त संपूर्ण जग हा थरार पाहत आहे.

यादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायुसेना स्थापना दिनानिमित्त ट्वीट करत अभिमान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment