मुख्यमंत्री, तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी ; कंगनाची पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्या निमित्त आपल्या ठाकरे शैलीत रोखटोख भाषण करत भाजप, नरेंद्र मोदी, कंगणा राणावत यांना टिकेच लक्ष्य करत जोरदार प्रहार केला. घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर आहे म्हणणारा रावण आला आहे, असे उद्धव ठाकरे कंगनाला उद्देशून म्हणाले होते. उद्धव ठाकरेंच्या याच टीकेचा अभिनेत्री कंगना राणावतने समाचार घेतला आहे.

‘मुख्यमंत्री, तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी. लोकसेवक असताना तुम्ही क्षुल्लक गोष्टींवरून संघर्ष करत आहात. तुमच्याकडे असणारी सत्ता तुमच्याशी सहमत नसलेल्या इतरांचा अपमान करण्यासाठी, त्यांना हानी पोहोचवण्यासाठी वापरत आहात. घाणेरडं राजकारण करून मिळवलेल्या खुर्चीसाठी तुम्ही पात्र नाही. तुम्हाला लाज वाटायला हवी,’ अशा शब्दांत कंगनानं मुख्यमंत्री ठाकरेंवर पलटवार केला आहे.

‘मुख्यमंत्री देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. यांना महाराष्ट्राचं ठेकेदार कुणी बनवलं? हे केवळ जनतेचे सेवक आहेत. यांच्या आधी कोणीतरी होतं. यांच्यानंतर कोणीतरी वेगळी व्यक्ती त्यांच्या जागी असेल. ते महाराष्ट्र स्वत:च्या मालकीचा असल्यासारखं का वागतात?’ असा सवाल कंगनानं उपस्थित केला आहे.

घरी खायला मिळत नाही, मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, या मुख्यमंत्र्यांच्या टीकेलादेखील कंगनानं प्रत्युत्तर दिलं. ‘ज्या प्रकारे हिमालयातलं सौंदर्य प्रत्येक भारतीयासाठी आहे, त्याचप्रकारे मुंबईदेखील सगळ्यांची आहे. तिथे मिळणाऱ्या संधी प्रत्येक भारतीयासाठी आहेत. उद्धव ठाकरे, आम्हाला लोकशाहीनं दिलेले अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला विभागण्याचा प्रयत्न करू नका. तुमची गलिच्छ भाषणं तुमची अकार्यक्षमता दाखवतात,’ अशा शब्दांत कंगना मुख्यमंत्र्यांवर बरसली आहे.

तत्पुर्वी, घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची. अनधिकृत बांधकाम मुंबईत करायची. हिंमत असेल तर पाकव्याप्त सोडा काश्मीरमध्ये अधिकृत बांधून दाखवा. मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर आहे म्हणणारा रावण आला आहे, असे उद्धव ठाकरे कंगनाला उद्देशून म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment