अभिनेत्री पायल घोषची राजकारणात उडी ; आठवलेंच्या ‘आरपीआय’चा झेंडा घेतला हाती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणारी अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh)हिने आता राजकारणात उडी मारली आहे. पायलने नुकतंच रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी मध्ये प्रवेश केला आहे. रामदास आठवलेंनी आज (26 ऑक्टोबर) पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत पायलचा पक्ष प्रवेश पार पडला आहे. पायल घोषसह अभिनेत्री कनिष्का सोनी, बिल्डर योगेश करकेरा, उद्योजक अंकूर चाफेकर यांनी आरपीआयमध्ये पक्षप्रवेश केला आहे.

अनुरागने लैंगिक शोषण केल्याचा दावा करणाऱ्या पायलने आपल्याला न्याय मिळावा असे म्हणत अनेक खटाटोप केले होते. पोलीस तक्रार दाखल केल्यानंतरही अनुरागची चौकशी न झाल्याने तिने थेट राज्यपालांकडे धाव घेतली होती.त्यावेळी तिला रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पाठिंबा दर्शवला होता.

या पत्रकार परिषदेत रामदास आठवलेंनी पायलचा पक्षप्रवेश जाहीर केला. ते म्हणाले, ‘पायल घोषवर अन्याय झाला होता. तिने अनुराग कश्यपविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पायलवर अन्याय झाल्याने आपण तिची बाजू घेतली, आंदोलन केले, राज्यपालांना भेटलो. यानंतर याप्रकरणात पुढच्या हालचाली सुरू झाल्या.’मात्र, पोलिसांनी अद्याप अनुरागला अटक केली नाही. त्याच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. यासगळ्यात आम्ही पायलसोबत आहोत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook