अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । शपथविधी होऊन तीन दिवस होत नाही तोच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीतून बंडखोरी करत भाजप सोबत गेलेले पवार यांनी आज अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आज अनेक वेगवान घडामोडी घडत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आजच्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात आता सत्तापेच सोडविण्यासाठी 24 तास बाकी असतांना आजची ही दूसरी सर्वात मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागेल. तीन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

आज दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उद्या बहुमत सिद्ध करण्यास सांगितलेले होते मात्र त्यात्पूर्वीच अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे काल महाविकासआघाडीने ‘आम्ही 162’ कार्यक्रमांतर्गत केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे व जयंत पाटील यांच्या गटनेता म्हणून निवड झाल्यामुळे अजित पवार यांनी आपले बंड मागे घेत आज राजीनामा सादर केला आहे.

Leave a Comment