येत्या 8-10 दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाउन बाबत निर्णय घेऊ – अजित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिवाळीनंतर राज्यात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढला आहे. हिवाळ्यात हा वेग आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. बर्‍याच राज्यात कोरोना संक्रमण वाढले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार करत असून येत्या 8 ते 10 दिवसांत सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार असून लॉकडाउन बाबत पुढील निर्णय घेण्यात येईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटल आहे.

अजित पवार म्हणाले, की “दिवाळीच्या वेळी बरीच गर्दी होती. गणेश चतुर्थी दरम्यानही अशीच परिस्थिती होती. आम्ही संबंधित विभागांशी बोलत आहोत. आम्ही पुढील 8-10 दिवस परिस्थितीचा आढावा घेऊ आणि नंतर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल”. ते पुढे म्हणाले की, दिवाळीच्या वेळी लोकांनी अशी गर्दी केली जणू या गर्दीमुळे कोरोना मरणार आहे.”

दरम्यान कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही लाट म्हणजे लाट नसून त्सुनामी असेल असं स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले असून याबाबत जनतेला गाफील राहु नका, काळजी घ्या असे आवाहनही त्यांनी केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment