ठरलं अजित पवारचं उपमुख्यमंत्री होणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या राजकीय सत्ता नाट्यावर अखेर पडदा पडला. बहुमत सिद्ध करू न शकल्याकारणाने भाजपा सरकार कोसळले आणि महाविकासआघाडीला सत्तास्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान ज्या अजित पवार यांच्या पाठिंब्यानं देवेंद्र फडणवीस रातोरात मुख्यमंत्री बनले त्याचबरोबर भाजपने काही तास सत्ता काबीज केली होती. हे बघता उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह तयार झाले होते.

मात्र आता महाविकासआघाडीची उद्धव ठाकरे यांच्या नैत्रुत्वात सत्तास्थापन होत असताना राष्ट्रवादीकडून अजित पवारच उपमुख्यमंत्री होणार अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे. अजित पवार यांचे बंड शमवण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जरी यश आले असले तरी. राष्ट्रवादीतील अजित पवार समर्थक गट अजित पवारच उपमख्यमंत्री व्हावे म्हणून आग्रही दिसत आहे. त्यामुळं राष्ट्रवादीवर एक दबाव तयार होऊन आता उपमुख्यमंत्री होणार हे आता निश्चित मानलं जात आहे. तसेच कुटुंब कलह विकोपाला जाऊ नये म्हणून अजित पवार यांचा राग शांत करण्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड शरद पवार करू शकतात अशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. सध्या अजित पवार यांच्याबाबतीत अखेरचा फैसला काय होतो हे संध्याकाळी होणाऱ्या शपथविधी दरम्यानच राज्याच्या जनतेला कळणार आहे.

Leave a Comment