शिवजयंतीनिमित्त ३ हजार भगव्या झेंड्यांचे वाटप ; मनसेच्या कार्यकर्त्यांकडून शिवभक्तांना भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्रात बुधवारी शिवजयंती विविध उपक्रम साजरे करत मोठ्या जल्लोषात साजरी झाली. औरंगाबादमध्ये शिवजयंती निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात शिवजयंती निमित्ताने क्रांतीचौकात येणार्‍यांना ३ हजार झेंड्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने क्रांतीचौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यांनतर झालेल्या कार्यक्रमात शिवजयंतीच्या निमित्ताने क्रांतीचौकात येणार्‍यांना ३ हजार झेंड्याचे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, मनसे महिला आघाडीच्या लिला राजपूत, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राजीव जावळीकर, मंगेश साळवे, अनिकेत निलावार आदीसह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

Leave a Comment