आम्ही भारत चीन सीमावादात मध्यस्थी करण्यास तयार – डोनाल्ड ट्रम्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । गेले काही दिवस सुरु असणार भारत चीन वाद जगभरात चांगलाच चर्चेत आला आहे. चीन युद्धाच्या तयारीत असल्याची शंका वर्तविली जात आहे. चीनने मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु केल्या आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आता या प्रकरणावर बोलले आहेत. त्यांनी चीन आणि भारत यांच्या सीमावादावर आम्ही मध्यस्थी करण्यास तयार आहोत. आमची तशी ईच्छा आहे. आणि ते करण्यास आम्ही सक्षम आहोत असेही त्यांनी सांगितले आहे. तशी माहिती आम्ही दोन्ही देशांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

भारत आणि चीनचा सीमावाद चिघळला आहे. दोन्ही देशातील सैन्य आता मोठ्या प्रमाणात सीमेवर तैनात आहे. चीनने नागरी गुन्सा विमानतळावर वेगाने धावपट्टी बांधत असल्याच्या बातम्या आहेत. भारताच्या सॅटेलाईट ने घेतलेल्या फोटोमध्ये ते स्पष्ट दिसून येते आहे. भारताने लडाख सीमेवर रस्ता बांधण्यास सुरुवात केल्यापासून हा वाद चिघळला आहे. गेल्या अनेक वर्षात चीनने सीमेवर रस्तेबांधणी तसेच इतर निर्माण कार्य केले आहे. पण भारताने कामास सुरुवात केल्यावर त्यांनी विरोध केला. तरीही रस्तेबांधणीचे काम सुरूच ठेवल्यामुळे चीनने सीमेवर स्वतःचे सैन्य वाढविले आहे.

चीनसोबत भारतानेही आपले सैन्य वाढविले आहे. आतापर्यंत भारताच्या आणि चीनच्या उच्च स्तरीय अधिकाऱ्यांमध्ये बैठकाही झाल्या आहेत. त्यांच्या मध्ये चर्चा झाल्या आहेत. तरीही चीनने हळूहळू सीमेवर सैन्य वाढविण्यास सुरुवात केली आहे. चीनकडून येणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारतही सज्ज आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या विषयात लक्ष दिल्यामुळे आता दोन्ही देशांकडून काय भूमिका घेण्यात येईल. याकडे सर्वांचे लक्ष आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment