लातूरमधील देशमुखी कायम राहणार का? अमित आणि धीरज देशमुखांच्या प्रचारसभांना कुटुंबीयांचीही उपस्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर प्रतिनिधी । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कुटुंबातील दोघेजण पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरलेले आहेत. लातूर शहर विधानसभा मतदार संघात अमित देशमुख तर लातूर ग्रामीणमध्ये विद्यमान जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख निवडणूक लढवीत आहेत. या दोन्ही भावांच्या प्रचारासाठी लातूरमध्ये दाखल झालेला अभिनेता रितेश देशमुख सध्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. शिवाय संपूर्ण देशमुख कुटुंबीय सध्या प्रचारात दंग असून प्रचारसभांना लोकांची गर्दी होत असल्याचं पहायला मिळत आहे.

लातूर शहर आणि ग्रामीण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या दोन्ही मतदार संघातील वर्चस्व कायम ठेवण्याच्या अनुषंगाने लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शुक्रवारी कुटुंबासमवेत या दोन्ही भावांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यावेळी सर्व कुटुंबीय उपस्थित होते. कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांना आकर्षण होते ते रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांचे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर धीरज देशमुख यांच्या प्रचारासाठी ते शुक्रवारीच ग्रामीण भागात दाखल झाले होते. दोन्ही मतदार संघ काँग्रेसच्या आणि या देशमुख भावांच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. त्यामुळेच अर्ज दाखल केल्यापासून माजी मंत्री दिलीपराव देशमुख, रितेश देशमुख, वैशालीताई देशमुख यांनी प्रचारावर जोर दिला आहे.

आपल्या भाषणात लोकांना भावनिक साद घालण्याचं काम रितेश देशमुख करत असून, विरोधी उमेदवार कुणीही असुद्या धीरज भैय्या हा एकच चेहरा डोळ्यासमोर ठेवून मतदान करायचं असं ठासून सांगण्याचं काम त्यांनी केलं. वडिलांच्या आठवणींना उजाळा देत लातूर ग्रामीणचा विकास करण्याची संधी धीरज देशमुख यांना द्या असा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थित लोकांना दिला.

इतर महत्वाच्या बातम्या –

Leave a Comment