शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले अमित घोडा अर्ज मागे घेण्याच्या तयारीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । पालघर शिवसेनेचे बंडखोर आमदार अमित घोडा यांनी तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र तीनच दिवसांत ते राष्ट्रवादी सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुन्हा एकदा ते स्वगृही परतणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सोमवारी अमित घोडा आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता असल्याने आता राष्ट्रवादीसमोर घोडा यांची मनधरणी करण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

अमित घोडा यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. घोडा यांनी पक्षात प्रवेश केल्याबरोबर राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी देखील जाहीर केली. मोठं शक्तीप्रदर्शन करत घोडांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु घोडा आता अर्ज माघार घेणार असल्यामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी घोडा यांच्यावर दबाव आणल्याचं बोललं जातं आहे. आता घोडा नेमकं काय करतात याकडे कार्यकर्त्यांसह विरोधकांचेही लक्ष लागले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

 

 

 

Leave a Comment