लष्कर -ए -देवेंद्र अस्वस्थ, टीका करणे हा एकमेव धंदा शिल्लक – अमोल मिटकरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकोला प्रतिनिधी | आघाडी सरकारच्या लोकप्रियतेने लष्कर -ए -देवेंद्र अस्वस्थ झाली आहे . काही धंदा न राहिल्याने फक्त्त टीका करणे हा आता  एकमेव धंदा शिल्लक आहे असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केले आहे. वाधवान कुटुंबियांच्या पाचगणी प्रवासावरुन भाजप समर्थक महाविकास आघाडीवर टिका करत आहेत. यावर आता मिटकरी यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

महाविकास आघाडीच्या लोकप्रियतेमुळे भाजप समर्थक अस्वस्थ झालेले आहेत. अाघाडी सरकार कोरोनाची परिस्थिती उत्तमरित्य हाताळत असताना भाजप सरकारवर टीका करत आहे.  आघाडी सरकारच्या लोकप्रियतेने लष्कर -ए -देवेंद्र अस्वस्थ झाली आहे . काही धंदा न राहिल्याने फक्त्त टीका करणे हा आता  एकमेव धंदा शिल्लक आहे असे मिटकरी यांनी म्हटले आहे.

 

तसेच मिटकरी यांनी थोडं  सॅनिटायझर राखुन ठेवा,लॉक डाउन नंतर १०५ मेंदु स्वच्छ करायच्या कामी पडेल अशी विनंती रोहित पवार यांना केली आहे. यावर पवार यांनी अकोल्याला सॅनिटायझर पाठवले आहेत असं म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in

Leave a Comment