उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केजरीवाल यांना तब्बल ६ तास रांगेत उभं राहावं लागलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । आम आदमी पक्षाचा उमेदवार म्हणून आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, उमेदवारी अर्ज भरताना केजरीवाल यांना तब्बल ६ तास आपला अर्ज दखल करण्यासाठी लागले. मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यानुसार अरविंद केजरीवाल रिटर्निंग अधिकाऱ्याच्या कार्यालयात आज मंगळवारी १२ वाजता पोहोचले यावेळी त्याचे आई-वडील आणि पत्नी सोबत होत्या.

दरम्यान, केजरीवाल सोबतच इतरही बरेच अपक्ष उमेदवार आपला अर्ज भरण्यासाठी कार्यालयात आले होते. त्यामुळं केजरीवाल यांना अर्ज भरण्यासाठी ४५ नंबरचे टोकन देण्यात आले. याबाबतची माहिती केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली. त्यानुसार तब्बल ५ तासांच्या प्रतीक्षेनंतर केजरीवाल यांच्या नंबर येऊन येऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा जागेवरून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याआधी २०१४ आणि २०१५ साली त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. २०१४ मध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचा नवी दिल्ली जागेवर पराभव केला होता.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

दिल्ली निवडणुकीत भीम आर्मीच्या चंद्रशेखरची दमदार एन्ट्री, काही अटी घालून न्यायालयाने निर्बंध उठवले

दिल्ली विधानसभा निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७ उमेदवारांची यादी जाहीर

“#केजरीवालनामहै_उसका” ट्विटरवर ट्रेंडिंगला, दिल्लीकरांकडून भाजप, काँग्रेसवर धुव्वाधार टीका

Leave a Comment