दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूल नव्हते, पण …. ; अशोक चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात त्रिशंकू परिस्थिती झाल्यानंतर दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत युती करण्यास अनुकूल नव्हते. पण राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे आणि पुढाकाराने महाविकासआघाडी प्रत्यक्षात अस्तित्वात आली असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला.

दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत युती करायची की नाही, या संभ्रमात होते. पण भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेबरोबर आघाडी करावी, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे मत होते. भाजपने काँग्रेस संपवण्याचे काम सुरु केले होते. त्यामुळे काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत येण्यास तयार झाला, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेना आणि भाजप हे जुने मित्र एकमेकांपासून लांब गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पुढाकाराने आणि काँग्रेसने घेतलेल्या संयमी भूमिकेमुळे राज्यात प्रथमच महाविकास आघाडीची स्थापना होऊन सरकार बनलं. आणि 105 आमदार असूनही भाजप विरोधी पक्षात बसला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook