संभाजी पाटील-निलंगेकरांच्या विश्वासू साथीदाराची बंडखोरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर प्रतिनिधी । ‘भाजपा’कडून उमेदवारी जाहीर होताच नाराजांनी बंडखोरीचे हत्यार उपसले आहे. लातूरमध्ये पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजपाचे जिल्हा परिषद कृषी सभापती बजरंग जाधव यांनी देखील बंडखोरी केली आहे. त्यांच्या या बंडखोरीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे विधानसभेसाठी उमेदवारी मिळालेल्या अभिमन्यू पवार यांना नेमका विरोध कुणाचा अशी चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे. दरम्यान ‘औसा’ मतदारसंघातून उमेदवारी कुणाला मिळणार याची उत्सुकता जिल्ह्याला लागली होती. शिवसेनेची ही परंपरागत जागा भाजपला सोडण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खासगी स्वीय सहाय्यकांना उमेदवारी घोषित करण्यात आली. मात्र, येथील ‘भूमीपुत्रच आपला प्रतिनिधी असावा’ अशी मागणी औसेकरांची आहे. नेमकी हीच बाब ओळखून जिल्हा परिषद सदस्य बजरंग जाधव यांनी तयारी सुरू केली होती. त्यांनी प्रचारही सुरू केला होता. मात्र, मंगळवारी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आणि यामध्ये औसा मतदारसंघासाठी अभिमन्यू पवार यांचे नाव घोषित करण्यात आले. याच दरम्यान दुसरीकडे बजरंग जाधव यांनी बंडखोरी केल्याने यामागे नेमके कारण काय? असा सवाल उपस्थित होत आहे. बजरंग जाधव हे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांचा शब्द त्यांच्यासाठी प्रमाण असतानाही हे बंडखोरीचे अस्त्र का? असा सवाल कायम आहे.

Leave a Comment