अभिजित कटके आणि बाला रफिक शेख महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र। महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आज धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. महाराष्ट्र्र केसरीचे दोन दमदार दावेदार असेलेल्या पैलवानांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आज महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बाला रफिक शेखला चितपट करत सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेने बाजी मारली आहे. तर अभिजीत कटकेला नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर या मल्लाकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी या स्पर्धेत बाला रफिक शेख हा विजयी ठरला होता. तर अभिजीत कटके वर्ष १७-२०१८चा स्पर्धेचा विजयी पैलवान होता. यावर्षीही दोघांचे स्पर्धेत वर्चस्व असेल असं वाटत होतं मात्र त्यांच्या पराभवाने सगळ्यांचा धक्का बसला आहे.

स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अवघ्या सव्वा मिनिटांमध्ये ज्ञानेश्वर जमदाडेने बाला रफिक शेखला चितपट केलं आहे. बाला रफिक शेख हरल्यामुळे तो स्पर्धेबाहेर झाला आहे. बाला रफिक शेख पाठोपाठ अभिजित कटके सुद्धा उपांत्य फेरीत  हरल्याची बातमी मिळाल्यानं यंदाच्या स्पर्धेतील हा मोठा फेरबदल मानला जात आहे. मॅट विभागाच्या अंतिम फेरीत अभिजित कटकेला नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर या मल्लाकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आहे. सलग चौथ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब मिळवायचा असा निश्चय करुन मॅटवर उतरलेल्या अभिजित कटकेला हर्षवर्धनने ५-२ अशा फरकाने हरवून थरारक विजय आपल्या नावावर नोंदवला आहे.

हर्षवर्धन सदगीर हा अर्जुनवीर काका पवारांचा चेला आहे. पुण्यातल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात तो सराव करत होता. अभिजित कटके आणि बाला रफिक शेख हे दोन्ही मल्ल महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाहेर गेले आहेत त्यामुळे यावर्षी महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा यंदा नवा पैलवान उचलणार यात शंकाच नाही.

Leave a Comment